पुस्तकपरीक्षण ‘कातकरी’
कातकरी: विकास की विस्थापन हे पुस्तक छोटेखानी विश्वकोषाचे स्वरूपाचे आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रामुख्याने रायगड जिल्ह्यात आदिवासी जमातीची म्हणजेच कातकरींची विविध प्रकारची माहिती इथे एका सुसंगत क्रमाने वाचकांना नवीन विषयाची पुरेशी ओळख करून देते. पुस्तकातील विवेचनाला श्री मिलिंद बोकील यांचा प्रत्यक्ष समाजकार्याचा त्यापरिसरातील दोन दशकांचा अनुभव आणि व्यासंगपूर्ण संदर्भ वाचनाचे साक्षेपी उल्लेख यांची जोड मिळालेली …